कोकण

झाड तोडल्यास ५० हजार दंड

CD

विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड
अवैध वृक्षतोडीला आळा; स्वमालकीच्या झाडांसाठीही शासनाचा नियम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः राज्यशासनाने अनियंत्रित वृक्षतोड रोखण्यासाठी नियमावली कडक केली आहे. विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात केली आहे. स्वमालकीच्या जमिनीवर उभे असलेले झाडही प्रशासनाच्या परवानगीशिवाय तोडता येत नाही, अशी सक्ती कायद्यात आहे. कायद्याच्या धाकामुळे जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीला आळा बसणार आहे.
जमिनीवरील झाडाचे वय, प्रकार, धोकादायक स्थिती किंवा पर्यायी लागवड शक्य आहे का, याची पाहणी करूनच झाड तोडण्यास परवानगी दिली जाते. कायद्याचा धाक असला तरी नियमांचे तंतोतंत पालन होते का हा सुद्धा प्रश्नच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांधकाम, रस्ते, विस्तार, बागायती लागवड किंवा प्लॉट विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जातात. त्यासाठी विकासकांकडून परवानगी घेतली जाते का, दंडाची तरतूद कठोर असली तरी प्रत्यक्षात कारवाई मात्र फारच मर्यादित असल्याचे स्पष्ट होत आहे. जमीनमालक, संस्था किंवा घरमालकाने झाड तोडण्यापूर्वी संबंधित विभागाकडे अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. झाडाचे वय, प्रकार, स्थिती, धोका, पर्यायी नवीन लागवड याचा अहवाल घेऊनच परवानगी दिली जात आहे. विनापरवाना झाड तोडल्यास कमाल पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात येतो. गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे. स्वमालकीच्या जमिनीतील झाडेही विनापरवानगी तोडता येत नाहीत. आंबा, फणस, जांभूळ, कडुनिंब, वड, पिंपळ, साग, सिसम, अर्जून, कांचन यासारख्या झाडांसाठी कायदा लागू आहे.
------
चौकट
वृक्षतोडीवर नियंत्रण
अनियंत्रित वृक्षतोड, शहरीकरणाचा वाढता वेग, जैवविविधतेचा धोका लक्षात घेऊन विशेष कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यासाठी झाड तोडण्याची परवानगी वनपरिक्षेत्र कार्यालय, नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये घ्यावी लागते त्यानंतर झाडे तोडता येतात. या कायद्यामुळे वृक्षतोडीवर नियंत्रण राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT