कोकण

पाटण घाटमार्गाला लवकरच मिळणार चालना

CD

‘संगमेश्वर-पाटण’ मार्गाला लवकरच चालना
प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ; अपर सचिवांकडे पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाला गती मिळावी म्हणून घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना पत्र दिले होते. घाटमार्ग मंजुरीचे प्रशासकीय काम प्राधान्याने करण्याच्या सूचना म्हैसकर यांनी दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव कार्यालयाकडून रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवावा, असे पत्राद्वारे आदेश प्राप्त झाले आहेत. त्या आदेशाची एक प्रत संगमेश्वर-पाटण घाटमार्ग समन्वयक समितीचे समन्वयक संतोष येडगे यांना प्राप्त झाले आहे तर रत्नागिरी अधीक्षक अभियंता यांनी मंत्रालयात पाठवलेल्या प्रस्तावाची माहिती संतोष येडगे यांना अवगत करावी, अशा स्पष्ट सूचना बांधकाम सचिवाकडून देण्यात आल्या आहेत. संगमेश्वर ते पाटण या ४६ किलोमीटरमधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च कंपनीला दिले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्याची जबाबदारी या कंपनीकडे आहे. डीपीआरसाठीच्या निधीसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता. संगमेश्वरपासून सुरू होणाऱ्या या घाटमार्गाचा हातखंबा, रत्नागिरी, बावनदी, आंबेड, कोसुंब, करंबेळे, वाशी, धामणी तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, पाचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे, नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे आदी खाडीपट्ट्यातील सह्याद्रीरांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परिसरातील गावांमधील लाखो नागरिकांना या मार्गाचा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Gajanan Maharaj : संतनगरीत आज 'श्रीं'चा १४८ वा प्रगटदिन उत्सव; दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार मंदिर; शेगावात भक्तांची मांदियाळी

Propose Day 2026 Special Recipe: प्रपोज डे ला बनवा खास शाही तुकडा, चव अन् प्रेम दोन्ही होईल दुप्पट, लगेच नोट करा रेसिपी

T20 World Cup: आठवणीत रमताना: २००७ ची फायनल, विंडीजचा धमाका ते २०२४ मधील विजेतेपद...

आजचे राशिभविष्य - 08 फेब्रुवारी 2026

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

SCROLL FOR NEXT