-rat३p१७.jpg-
२५O०८२५०
रत्नागिरी पालिका
---
घसरलेला मतदाराचा टक्का चिंतेची बाब
रत्नागिरी पालिका निवडणूक ; मतदारांची बदललेली मानसिकता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) ५५.०९ टक्के मतदान झाले. मतदानाचा घसरलेला टक्का चिंता वाढवणार आहे. मतदारांची बदललेली मानसिकता आणि प्रशासनाचे जागृतीसाठीचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी पालिकेची निवडणूक नऊ वर्षांनी होत होती. चार वर्षे पालिकेवर प्रशासक होता. आजवरच्या इतिहासात एवढ्या काळासाठी कधीच प्रशासकीय राजवट लागली नव्हती. निवडणूक विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी अनेक प्रयत्न केले, स्वाक्षरीची मोहीम घेतली, पथनाट्य झाली, घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकावरून आवाहन, रॅली झाली, सेल्फी पॉइंट तयार केले; परंतु नऊ वर्षांनी हा मतदानाचा उत्सव असल्याचे मंगळवारच्या वातावरणातून दिसत नव्हते. नागरिक आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त होते. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची धावपळ दिसत होती; परंतु मतदार मतदानासाठी बाहेर पडत नव्हते. मतदानासाठीचा उत्साह दिसत नव्हता.
यापूर्वी मतदारांना बाहेर काढण्यापासून ते बाहेरच्या मतदारांना आणण्यापर्यंत आधीपासूनच नियोजन होत होते. त्यासाठी कार्यकर्त्यांवर टाकलेली जबाबदारी, त्यांची धावपळ, ग्रुपने मतदानासाठी बाहेर पडण्याचा उत्साह कुठेच दिसत नव्हता; परंतु आता विकासकामे किंवा उमेदवाराचा स्वच्छ चेहरा हा निकष मागे पडताना दिसत आहे. राजकारणाच्या घसरलेल्या पातळीमुळे मतदान करण्याची इच्छा होत नाही, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत.
---
चौकट
...म्हणून झाले कमी मतदान?
प्रभाग क्र. ६ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ४३.९० टक्के मतदान झाले. मुळात हा प्रभाग भाजपचा पारंपरिक प्रभाग आहे. येथून अविनाश साटमसह अनेक भाजपचे उमेदवार निवडून गेले आहेत. त्यामुळे महायुतीने येथे भाजपचा उमेदवार राजू कीर आणि मेधा कुलकर्णी या दोघांना उमेदवारी दिली; परंतु मूळ भाजपचा उमेदवार नसल्याने तिथे काहीशी नाराजी होती. त्यामुळे या ठिकाणी सुशिक्षित मतदार बाहेरच पडला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सर्वांत कमी मतदान या प्रभागात झाले.
----
चौकट
प्रभागनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी -
प्रभाग क्र. १* ५८.०६ टक्के
प्रभाग क्र. २* ५४.०७
प्रभाग क्र. ३* ४८.९६
प्रभाग क्र. ४* ५९.७०
प्रभाग क्र. ५* ६२.९२
प्रभाग क्र. ६* ४३.९२
प्रभाग क्र. ७* ५३.०३
प्रभाग क्र. ८* ५०.०७
प्रभाग क्र. ९* ५०.१२
प्रभाग क्र. १०* ४७.५६
प्रभाग क्र. ११* ५७.४४
प्रभाग क्र. १२* ६३.३३
प्रभाग क्र. १३* ५५.५५
प्रभाग क्र. १४* ५९.१९
प्रभाग क्र. १५* ६३.१६
प्रभाग क्र. १६* ५६.७४
.......................
एकूण* ५५.०९ टक्के
--------------------
चौकट
‘ते’ दोन उमेदवार नॉट रिचेबल
दरम्यान, पालिकेच्या प्रभाग सहामध्ये कमी झालेल्या मतदानाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मेधा कुलकर्णी आणि राजू कीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र या दोघांचेही फोन लागले नाहीत. त्यामुळे मतदान कमी का झाले, याबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.