कोकण

गौरीज सणसची जिल्हा कबड्डी संघात निवड

CD

- rat४p३.jpg-
२५O०८३६७
गौरीज सणस
---
गौरीज सणस जिल्हा कबड्डी संघात
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ ः तालुक्यातील टाळसुरे येथील कै. अण्णासाहेब बेहेरे कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थी व अमर भारत क्रीडामंडळाचा खेळाडू गौरीज सणस याची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. सलग चौथ्या वर्षी राज्यपातळीवर खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ मैदानावर ५२वी कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. जिल्हा तसेच दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या चाचणीतून सुरवातीला २० संभाव्य खेळाडू निवडण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांच्या सराव शिबिरानंतर अंतिम १४ जणांचा जिल्हा संघ घोषित करण्यात आला. यामध्ये गौरीजने उत्तम कामगिरी करत स्थान निश्चित केले. यापूर्वीही कुमारगटात दोनवेळा तर किशोर गटात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला एकूण चारवेळा राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून दादू सुर्वे (दापोली) व व्यवस्थापक म्हणून प्रथमेश लाले यांची निवड झाली आहे. पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत गौरीज सणस रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

Ajit Pawar Death News LIVE Updates : ऐकल्यावर माझा विश्वासच बसला नाही - एकनाथ शिंदे

IND vs NZ, 4th T20I: न्यूझीलंडची दणक्यात सुरुवात, नंतर भारतीय गोलंदाजांनीही दाखवला क्लास; पण तरी विजयासाठी विक्रमी धावांचं लक्ष्य

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Nagpur News : दादाची आस्थेने विचारणा! गावात सगळ्यांनी जेवण केलं का? ‘चानकी’ गावासाठी ‘दादा’ ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT