कोकण

‘एक्स्पायरी डेट’मधून पाश्‍चात्त्य विचारांचा विनोदी वेध

CD

राज्य नाट्य स्पर्धा---लोगो

-rat४p४.jpg-
25O08388
रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धेत श्री शिवाई सहकारी पतसंस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘एक्स्पायरी डेट’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----

‘एक्स्पायरी डेट’मधून पाश्‍चात्त्य विचारांचा विनोदी वेध
शिवाई सहकारी पतसंस्थेचे सादरीकरण ; रंगतदार नाटकाला रसिकांची दाद

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः पाश्‍चिमात्य जीवनशैलीचे आणि वृद्ध–पालकांविषयी बदललेल्या दृष्टिकोनाचे दर्शन ‘एक्स्पायरी डेट’ या नाटकातून लेखक चैतन्य सरदेशपांडे यांनी प्रभावीपणे मांडले आहे. ‘माणसाच्या मृत्यूची तारीख कुणीही ठरवू शकत नाही’ या केंद्रस्थानी असलेल्या संकल्पनेला विनोदी ढंगाची जोड देत श्री शिवाई सहकारी पतसंस्था, येळवण यांनी राज्य नाट्यस्पर्धेत हे नाटक उजळून टाकले.
-------
नाटकाची सुरुवातच मृत झालेल्या व्यक्तीनंतर डीजे वाजवून होते. या कथेत नाना कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हे वयोवृद्ध दांपत्य. त्यांचा मुलगा अजय परदेशात पत्नी आणि मुलांसोबत राहतो; पण तो आई–वडिलांची काळजी घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या मृत्यूची वाट पाहण्यासाठीच सतत संपर्कात असतो. इमारतीतील रहिवासीही मिश्कील स्वभावाचे. लग्नात जशी बँडबाजा असतो तसा मृत्यूनंतरही इथे डीजे आणि बँडबाजा वाजवला जातो.
नाना डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक बेशुद्ध पडतात. डॉक्टर तपासणी करतात. ही बातमी इमारतीतील काही रहिवासी अजयला देतात. ‘नाना मेले तर त्याच दिवशी देशात येता येणार नाही’ या विचाराने तो आईकडून वडिलांची ‘एक्स्पायरी डेट’ काढण्याची विनंती करतो आणि त्यासाठी डॉक्टरलाही पाचारण करतो. या ‘मृत्यूच्या तारखे’साठी लग्नपत्रिकेप्रमाणे पत्रिका छापली जाते. घरात मंगलकार्याची धांदल, रडणारे लोक, गिटार, सनईवाले यांना आधीच बोलावण्यात येते.
निर्धारित दिवस जवळ येत असतो. सारेच तयारीत असतानाच, रिहर्सलदरम्यान नाना निपचित पडतात. सर्वांना वाटते, ‘नाना गेले!’, म्हणून रडारड सुरू होते; पण डीजेचा आवाज लागताच नाना उठून बसतात! अखेरीस मुलगा पुन्हा न येण्यासाठी परदेशात परत निघून जातो. विनोदी चढ-उतारांनी सजलेला हा कथाभाग रसिकांना खिळवून ठेवतो. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
---
* पात्र परिचय
नाना ः चिंतन तांबे, आई ः पल्लवी माने, म्हातारी ः अर्चना पाटील, राजू ः बाबली मयेकर, डॉक्टर ः नयन जोशी. मॅनेजरः निखिल मेस्त्री. अजय ः शुभम दाभाडे.
---
* सूत्रधार आणि सहाय्य
दिग्दर्शक ः चिंतन तांबे, नेपथ्य, विजय मिरगे, दीपक नगराळे. संगीत संयोजन ः हरेश बने, प्रथमेश नाईक. प्रकाश योजना ः साई शिर्सेकर. वेशभूषा ः गौरवी भोसले. सोनाली राजे. रंगभूषा ः उदयराज तांगडी. रंगमंच व्यवस्था ः श्रद्धा माळवदे, पूजा देशमुख, प्राची रिंगे, यज्ञा सावंत. विशेष आभार श्रीरंग संस्था रत्नागिरी.
-------------
आजचे नाटक...
नाटक ः जन्मवारी. सादरकर्ते ः कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे-रत्नागिरी. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ५ वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT