‘जिल्हा विधी सेवा’तर्फे दिव्यांग दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येथील मनोरुग्णालयात एड्स दिन जनजागृती कार्यक्रम व आविष्कार मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी शाळेत दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वयंसेवक श्रेयस रसाळ यांनी एड्सचा प्रसार व प्रतिबंध याबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. या वेळी पॅनल विधीज्ञ रती सहस्रबुद्धे तसेच स्वयंसेवक शुभ्रा पोवार, पूर्वा पवार, मनोरुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी उपस्थित होते तसेच आविष्कार मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी शाळेत दिव्यांग दिन कार्यक्रम साजरा झाला. सहस्रबुद्धे यांनी दिव्यांगांसाठी असलेले कायदे यावर मार्गदर्शन केले. या वेळी स्वंयसेवक प्रतीक्षा गोळपकर, सचिन वायंगणकर व आविष्कार शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.