-rat७p२०.jpg-
२५O०९०८५
राजापूर ः सानेगुरूजी विद्यामंदिरच्या आवारामध्ये बसविण्यात आलेल्या हवामान मोजपाम यंत्राच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित देणगीदार हेमंत गोखले आणि विद्यार्थी.
---
जानशी विद्यामंदिरमध्ये
हवामान मोजमाप यंत्र
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः तालुक्यातील जानशी येथील सानेगुरुजी विद्यामंदिरला पुणे येथील हेमंत गोखले यांनी हवामान मोजमाप यंत्र देणगी स्वरूपामध्ये दिले. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. अत्याधुनिक हवामान मोजमाप यंत्र हायस्कूलच्या आवारात बसविण्यात आले असून तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान, वायुदाब अशा विविध हवामान निर्देशांकांचे अचूक मोजमाप करण्याची क्षमता या उपकरणात आहे.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय अभ्यास करताना प्रात्यक्षिक पद्धतीने हवामानशास्त्र समजण्यासाठी आणि स्थानिक हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी हे हवामान मोजमाप यंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्याला मिठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, पुणे येथील हेमंत गोखले, नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, रमेश राणे, मुख्याध्यापक प्रसाद शिवणेकर, स्नेहल सुतार, सामाजिक कार्यकर्ते राजन लाड, आनंदा मोरे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी गावकर, मधुकर पावसकर आदी उपस्थित होते.
---