09465
चर्मकार समाज संघटनेतर्फे
सिंधुदुर्ग कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई, शाखा सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेची नियोजित संयुक्त सभा जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी झाली. सभेच्या प्रारंभी महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थितांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.
बैठकीत एक वर्षासाठी नवीन तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात आले. राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर व राज्य पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सी. आर. चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत केले. पदाधिकारी अनिल चव्हाण, यशवंत देवरुखकर, संजय चव्हाण, नंदकिशोर तेंडोलकर, सुरेश हरकुळकर, भारत पेंडुरकर, अंकुश चव्हाण, मंगेश चव्हाण, प्रकाश देवरुखकर, रामचंद्र नादकर, गुरुनाथ पवार, रघुनाथ चव्हाण, रमेश कुडाळकर, सहदेव चव्हाण, अंकिता पवार, अनिता चव्हाण, पूजा पवार, दिगंबर पावसकर, अनिल पवार उपस्थित होते. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती कार्यक्रमाबाबत श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस येथे ११ जानेवारीला सकाळी साडेदहाला घेण्याचे निश्चित केले. निवडलेले पदाधिकारी असे - सुनील चव्हाण वेंगुर्ले, अनिल पवार (देवगड), रामचंद्र नादकर (कणकवली), प्रकाश देवरुखकर (तालुका सचिव देवगड), गुरुनाथ पवार (उपाध्यक्ष देवगड), वर्षा समाजिसकर (महिला प्रतिनिधी देवगड), भारत पेंडुरकर (जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष), मंगेश चव्हाण (नियोजन समिती उपाध्यक्ष), रमेश कुडाळकर (कुडाळ कार्याध्यक्ष). दरम्यान, संतोष जाधव यांनी आभार मानले.