कोकण

सदाशिव पांचाळ यांना ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार

CD

09484

सदाशिव पांचाळ यांना ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार
तळेरे, ता. ९ : जगप्रसिद्ध एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांना कोल्हापूर येथील आढावा महाराष्ट्राचा लाईव्ह महाराष्ट्र चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा २१ डिसेंबरला शाहू स्मारक सभागृह, कोल्हापूर येथे होणार आहे.
या पुरस्काराबद्दल पांचाळ यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पांचाळ हे २००३ पासून शिक्षक नसतानाही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊननंतर ऑनलाईन पध्दतीने दुबई, मलेशिया, सिंगापूर, दोहा, कतार, अबुधाबी, नेदरलँड, साऊदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड अशा विविध देशांतील लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा ‘बुद्धिबळ’ हा मुलांच्या बौद्धिक क्षमता विकसित करणारा कार्यक्रम विशेष प्रसिद्ध झाला आहे. पांचाळ यांना यापूर्वीही विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT