कोकण

सिंधुदुर्गनगरीत सोमवारी महिला लोकशाही दिन

CD

सिंधुदुर्गनगरीत सोमवारी
महिला लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः डिसेंबरमधील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (ता. १५) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळाव, या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन उपक्रम घेण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथून उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन कले आहे.
.....................
‘मत्स्यव्यवसाय’मार्फत
जानेवारीपासून प्रशिक्षण
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलन प्रशिक्षणाचे ८७ वे सत्र १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत होणार आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मालवण येथे सुरू होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार युवकांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र. ग. मालवणकर यांनी केले आहे. इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालयास संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून घ्यावेत. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरून त्यावर संस्थेची शिफारस घेऊन विहित नमुन्यातील अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत कार्यालयास सादर करावे. अधिक माहितीसाठी प्रशिक्षण अधिकारी मालवणकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT