कोकण

चिपळूण- खेर्डीचे आकाश लकेश्री हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये चमकले

CD

rat9p6.jpg-
09480
आकाश लकेश्री
--------
हिमालयीन एक्स्ट्रीमध्ये
आकाश लकेश्रींची चमक
वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता; ८ तास ५२ मिनिटांत पूर्ण
चिपळूण, ता. ९ : तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. देशातील फार थोडे खेळाडू एवढ्या कठीण स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे.
हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग व धावणे या तीन टप्प्यांचा समावेश असतो. प्रचंड थंड वातावरण, खडतर पर्वतीय मार्ग, कमी ऑक्सिजन आणि तीव्र चढ-उतार यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना आपली शारीरिक व मानसिक क्षमता सिद्ध करावी लागते. या स्पर्धेत लकेश्री यांनी पोहण्याच्या २.८ किलोमीटर अंतरासाठी १७ ते १८ अंश तापमानाच्या थंड पाण्यात अवघ्या ५३ मिनिटांचा वेळ घेतला. त्यानंतरच्या ८८ किलोमीटर सायकलिंग टप्प्यात २४०० मीटर चढाचा सामना करत चार तास २७ मिनिटांत त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. शेवटचा आणि सर्वात कठीण मानला जाणारा २१ किलोमीटर धावण्याचा टप्पा १७०० मीटर चढासह तीन तास २१ मिनिटांत पूर्ण करत त्यांनी एकूण आठ तास ५२ मिनिटांत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
आकाश लकेश्री हे मूळचे खेर्डी येथील असून, सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. २०१८ ला त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधून एमबीए सुरू केले होते; मात्र फी भरण्यासाठी निधीअभावी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याच काळात त्यांनी ट्रायथलॉन हा खेळ निवडत आयुष्याला नवे वळण दिले. २०२० मध्ये दुबईमध्ये स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. लॉकडाउनच्या काळात ते चिपळूणमध्ये परतले आणि २०२१मध्ये रत्नागिरी येथे कोचिंग सुरू केले. २०२२-२३ मध्ये पुन्हा पुण्यात स्थलांतर करून त्यांनी क्रीडा प्रशिक्षण सुरू ठेवले. आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून नेपाळमध्ये झालेल्या एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला. ही स्पर्धा पूर्ण करून या स्पर्धेत भाग घेणारे भारतातील पहिले खेळाडू ठरले. आकाश लकेश्री यांच्या या यशामुळे चिपळूणचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उजळले आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Operation Tara : ताडोबातून सह्याद्रीत दाखल झालेली दुसरी वाघीण; ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत सॉफ्ट रिलीजमुळे व्याघ्र पुनर्स्थापन मोहिमेला नवे बळ

Year Ender 2025 : 2025 मध्ये पैशांशी संबंधित हे 10 मोठे नियम लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; काय बदललं तुमच्यासाठी?

Anna Hazare Hunger Strike : सशक्त लोकायुक्त कायदा अमलात आणण्यासाठी अण्णा हजारे पुन्हा रणांगणात; ३० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा!

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडी किंवा स्वबळावर कॉंग्रेस सज्ज; उमेदवारांची निवड सुरू!

Latest Marathi News Live Update : नगरमध्ये दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला

SCROLL FOR NEXT