कोकण

''शाळा वाचवा, शिक्षण वाचवा'' मंचचे बुधवारी धरणे आंदोलन

CD

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’
मंचचे बुधवारी धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १०ः शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त होणे या अधिकाराचे उल्लंघन होणार आहे. हा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी तसेच या अन्यायकारी शासन निर्णयाविरोधात शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गच्या वतीने बुधवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या निर्णयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१ माध्यमिक शाळा व शेकडो प्राथमिक शाळा बंद होणार आहेत. या शाळातील शिक्षकांचे समायोजन करण्याचे शासनाने ठरविले आहे. शिक्षकांचे समायोजन होऊन शिक्षकांची नोकरी टिकून राहील, याची शासन हमी देत असले तरी शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेला विद्यार्थी मात्र या निर्णयाने भरडला जाणार आहे. वास्तविक शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यान्वये एक कि.मी.च्या परिघात प्राथमिक शिक्षण व तीन कि.मी.च्या परिघात माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यास मिळणे आवश्यक आहे. शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त होणे या अधिकाराचेच उल्लंघन होणार आहे. यासाठी अन्यायकारी शिक्षण धोरणाविरोधात आणि शाळा व शिक्षण वाचविण्यासाठी १५ मार्च २०२४ शासन निर्णय रद्द करा, या मागणीकरिता बुधवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCPने पाळला, फडणवीसांसोबत झाली होती चर्चा

HbA1c Test Explained: डायबिटीज पेशंट्सना दर 3-6 महिन्याला 'ही' टेस्ट करणं का असतं महत्त्वाचं? जाणून घ्या HbA1C म्हणजे काय

Snow Leopard Viral Video : हिमालयातही आढळले बिबटे, BRO ने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ, चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT