कोकण

गंगातीर्थ परिसर स्वच्छतेमुळे सुंदर

CD

-rat११p४०.jpg-
२५O१००३२
राजापूर ः स्वच्छता अभियानानंतर स्वच्छ आणि सुंदर दिसणारा गंगातीर्थ कुंड परिसर.
----
गंगातीर्थ परिसर स्वच्छतेमुळे सुंदर
विद्यार्थ्यांचे श्रमदान; गांधीतीर्थ स्वच्छ शाळा अभियान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगातीर्थक्षेत्र परिसराची ओणी येथील नूतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सुमारे दोन तास राबवलेल्या या अभियानामुळे गंगातीर्थ परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला आहे. ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अभियानांतर्गत ओणी येथील नूतन विद्यामंदिच्या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाद्वारे महात्मा गांधीजींनी साऱ्‍यांना दिलेला स्वच्छता संदेश खऱ्‍या अर्थाने कृतीद्वारे साऱ्यांसमोर मांडला.
गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अभियानांतर्गत नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळे येथील गंगातीर्थ क्षेत्र परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता आणि साफसफाई केली. या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक विनोद मिरगुले, शिक्षक वसंत झोरे, अनिल दैत, काशिनाथ गुरव, कैलास भवारी, सुनील गोतावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मूळ गंगा, चौदा कुंड, मंदिर आणि गंगातीर्थक्षेत्र परिसराची साफसफाई केली.
------
चौकट
व्याख्यानमालेतून प्रबोधन
नूतन विद्यामंदिर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अभियानांतर्गत गांधीविचार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेमध्ये विविध वक्त्यांकडून आपापले विचार मांडून सामाजिक प्रबोधन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत; २५० टेबलांवर मतमोजणी, हातकणंगलेत सर्वाधिक २२ फेऱ्या

Pune ZP Results: वारसा विरुद्ध वर्चस्व! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाचा खेळ फसणार, कुणाचं नशीब चमकणार? चुरशीच्या लढाया कोणत्या?

Tax Credit Refund : इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडबाबत दिलासा

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

SCROLL FOR NEXT