10267
ग्रामस्थ एकवटताच गाव चकाचक
सुकळवाडमध्ये स्वच्छता; ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’
मालवण, ता. १२ : ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’ अंतर्गत आज सकाळी सुकळवाड गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी भाई गावडे दुकान ते शाळेजवळ जाणारा रस्ता तसेच शाळा परिसर याची ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे साफसफाई केली.
या अभियानात गावातील नागरिक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांमध्ये उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, माजी सरपंच प्रकाश पावसकर, डाटा ऑपरेटर रुपाली बिलये, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक प्रदीप पाताडे, साफसफाई कर्मचारी सुभाष म्हसकर आणि पोलिस पाटील लक्ष्मण काळसेकर यांचा समावेश होता. याशिवाय सुकळवाड ग्रामस्थांमधून अजय मयेकर, रुपेश गरुड, संतोष बिलये, हेमंतकुमार पाताडे, निखिल काळसेकर, नितीन पाताडे, भरत पाताडे, पंढरी पाताडे, पंकज पाताडे आणि रामचंद्र मुसळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामूहिक स्वच्छता अभियानातून गावातील रस्त्यांची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामुळे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा उद्देश पूर्णत्वास गेला.