कोकण

आठ महिन्यानंतरही कॅशबुक का सापडेना? ः बरेगार

CD

दहा दिवसांत कॅशबुक द्या,
अन्यथा आंदोलन अटळ

बरेगार ः माणगाव ‘वन’प्रश्‍नी इशारा

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. १३ ः ​वनविभागाच्या माणगाव येथील इमारतीला पुरविलेल्या वीजपुरवठा जोडणीसाठी १९८१ मध्ये भरणा केलेली सुरक्षा ठेव ज्या कॅशबुकमध्ये दर्शविली आहे, ते कॅशबुक दहा दिवसांत उपलब्ध करावे अथवा संबंधित कागदपत्रे गायब झाल्याबद्दल महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा २००५ च्या संबंधित कलमांनुसार पोलिसांत फौजदारी तक्रार दाखल करावी आणि त्याची प्रत आपणास द्यावी, अशी मागणी करत माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगर यांनी उपवनसंरक्षकांना निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास सोमवारपासून (ता. १५) उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
श्री. बरेगर यांनी २५ एप्रिलला या कॅशबुकच्या शोधासाठी फिर्याद दाखल केली होती. हे कॅशबुक कायमस्वरुपी जतन करण्याचे महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांनी ‘कॅशबुक आढळ होत नाही’ असे उत्तर दिले होते. कागदपत्र गहाळ होणे हा महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट २००५ चा भंग असल्याने, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पूर्वी केली होती. फिर्याद दाखल करून सुमारे आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही कॅशबुक उपलब्ध झाले नाही आणि पोलिसांत फिर्यादही दाखल झाली नाही. यामुळे श्री. बरेगर यांनी ५ डिसेंबरला उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना अंतिम नोटीस दिली आहे. या नोटिसीमध्ये नमूद केलेल्या दहा दिवसांच्या मुदतीत, म्हणजेच १५ डिसेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. नोटिसीची प्रत सावंतवाडी पोलिस ठाण्यालाही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT