कोकण

कर्णेश्वरच्या कलेचा वारसा सांगणारी कर्णेश्वरी साडी

CD

कर्णेश्वरच्या कलेचा वारसा
सांगणारी कर्णेश्वरी साडी
डॉ. आसावरी संसारे; कर्णेश्वर कला महोत्सवाला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ः साडी हे वस्त्र त्या-त्या भागातील सांस्कृतिक व भौगोलिक वारसा असतो. अतिप्राचीन काळात कोकणचे स्वतःचे अपरांतक नावाचे वस्त्र होते. त्यानंतर आज कोकण भूमीतील शिल्पसमृद्ध कसबा संगमेश्वर येथील श्री कर्णेश्वर मंदिरावरची कला यांचा संपन्न वारसा सांगणारी कर्णेश्वरी साडी यांचे यंदाच्या चौथ्या महोत्सवात उद्घाटन होत आहे, ही समाधानाची बाब आहे, प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) डॉ. आसावरी संसारे यांनी केली.
कर्णेश्वर महोत्सवातील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावर्षी महोत्सवाचे सर्व कलावंत व कार्यक्रमाचे प्रमुख यांना सावर्डे येथील सह्याद्री आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार अमृता साबळे म्हणाल्या, संपूर्ण सेंद्रिय कापूस व सेंद्रिय रंग वापरून सोळा रंगांमध्ये हातमागावर साकारलेली कर्णेश्वरी साडी हा कोकणचा नवा ब्रँड ठरेल. तसेच या भागात येणाऱ्या पर्यटकांना कर्णेश्वर महोत्सवात कर्णेश्वरी साडीची दिलेली भेट ही अभिमानास्पद आहे. याप्रंसगी साडीचे उत्पादक धनंजय प्रभूघाटे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विणकर ईश्वर धाबडी, तसेच ख्यातनाम अभिनेत्री संपदा जोगळेकर कुळकर्णी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Measurement: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! जमीन मोजणीचे कठोर नियम शिथिल; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेची टॉप १० मध्ये एन्ट्री पण इतर मालिकांचा TRP घसरला; 'बिग बॉस मराठी ६'चे काय हाल

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागावर दि. ०१.०२.२०२६ रोजी मेगा ब्लॉक

Pune Crime News : कात्रजमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; अजमल नदाफ गंभीर जखमी

"आजोबांनी माझे पाय धरले..." महाराणी येसूबाईंची भूमिका साकारण्याऱ्या प्राजक्ताचा अंगावर शहारे आणणारा अनुभव

SCROLL FOR NEXT