कोकण

परप्रांतीय फेरीवाल्यांना तळवडे गावात बंदी

CD

- rat१४p२०.jpg-
२५O१०६७६
राजापूर ः तळवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित सरपंच गायत्री साळवी, ग्रामपंचायत अधिकारी मंदेश जाधव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ.
---
परप्रांतीय फेरीवाल्यांना तळवडे गावात बंदी
ग्रामसभेचा निर्णय ; चोऱ्यांचे प्रकार टाळण्याचा प्रयत्न, मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाईचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः गावात चोऱ्यांचेही प्रमाण वाढलेले आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी परप्रांतीय फेरीवाल्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव तळवडे ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला. तसेच तालुक्याच्या मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित गुरांच्या मालकांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
सरपंच गायत्री साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा झाली. या सभेमध्ये विकासकामांसह विविध विषयांवर चर्चा करताना मोकाट गुरे आणि परप्रांतीय फेरीवाले यांच्यासंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश जाधव, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आत्माराम चव्हाण, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, सुरेश गुडेकर, संदीप बारसकर, सुनील गुरव, अमित चिले, राजन गुरव, भगवान कोकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरात मोकाट गुरांची समस्या दिवसागणिक अधिकच जटिल होवू लागली आहे. रस्ता ओलांडणाऱ्‍या तर, काहीवेळा रस्त्यामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या गुरांना धडक बसून अनेकवेळा जनावरांचा जीव गेला आहे. त्यात वाहन चालकांचेही नुकसान होत आहे. मोकाट गुरांच्या या समस्येवर तालुक्यामध्ये सातत्याने आवाज उठविला जात आहे. त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे दिवसागणिक मोकाट गुरांची समस्या अधिकच जटिल होवू लागली आहे. अशातच, तळवडे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये मोकाट गुरांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये चोऱ्या-घरफोड्यांसह दरोडे, खून यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी गावात येणारे परप्रांतीय फेरीवाले यांना गावात येण्याची प्रवेश बंदी करण्याचा ठरावही यावेळी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. यावेळी गावच्या अन्य विकासकामावर चर्चा होऊन त्यांचा आढावा घेण्यात आला. जलजीवन योजनेतंर्गत कामाचा आढावा घेण्यात आला व ही कामे अधिक जलदगतीने करण्याचे ठरले. यावेळी तळवडे गाव मधाचे गाव म्हणून जाहीर माहिती यावेळी ग्रामसभेमध्ये देण्यात आली.
---
जलजीवनच्या कामाचा आढावा
गावच्या अन्य विकासकामावर सभेत चर्चा होऊन त्यांचा आढावा घेण्यात आला. जलजीवन योजनेतंर्गत कामाचा आढावा घेण्यात आला व ही कामे अधिक जलदगतीने करण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT