कोकण

राजापूर तालुका प्रदर्शन उत्साहात

CD

राजापूर तालुका प्रदर्शन उत्साहात
राजापूर, ता. १६ ः राजापूर तालुका विज्ञान प्रदर्शन साखरीनाटे येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेमध्ये उत्साहात झाले. विज्ञान दिंडी, विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन, प्रश्नमंजूषा स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती स्पर्धा आणि आदी विविध उपक्रम झाले. तालुक्यातील ९० प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांनी मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतींनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञान अन् वैज्ञानिक संशोधनाचा जागर झाला.
‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावरील आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे साखरीनाटे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमजद बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तहसीलदार विकास गंबरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. या वेळी गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, साखरीनाटे सरपंच गुलजार ठाकूर, विज्ञान मंडळ जिल्हा कार्यवाह सुभाष सोकासने, विस्तार अधिकारी सुनील पाटील, फकीर महंमद पावसकर, मलिक गडकरी, दिवाकर आडविरकर आदी उपस्थित होते.
यामध्ये प्राथमिक विद्यार्थी गट प्रतिकृती स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चुनाकोळवणच्या पायल राजेंद्र भेरे हीने प्रथम, कोंड्ये हायस्कुलच्या स्वरा गुरव व तैसिम सिरवणकर हिने द्वितीय, तर गोखले कन्याशाळेच्या शर्विल उत्तम भोसले व वेदांत पवार यांच्या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत शिवणे खुर्द हायस्कूलच्या नंदन बापटने प्रथम, कोंडये हायस्कूलच्या सृष्टी कांबळे व श्रावणी सावंत यांनी द्वितीय, तर पाचल हायस्कूलच्या प्राची सुतार व नील जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन! सायलीनं दिलं खास सप्राईज, Tharla Tar Mag चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Pune Weather : पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा कायम; सकाळी आणि रात्री काहीसा गारवा

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

SCROLL FOR NEXT