कोकण

रत्नागिरी ः रेशनकार्ड धारकांना पुन्हा मिळणार साखर

CD

रेशनकार्ड धारकांना पुन्हा मिळणार साखर
२० रुपये दर ; अंत्योदयचे ३८ हजार ५३५ कार्डधारक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः महाराष्ट्र शासनाने दीड वर्षाच्या खंडानंतर अंत्योदय रेशनकार्ड धारकांसाठी साखर वितरण पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार ५३५ शिधापत्रिकाधारक गरजू कुटुंबांना महिन्याला १ किलो साखर २० रुपये प्रतिकिलो दराने पुन्हा मिळणार आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांकडे पुन्हा गोडधोड होणार आहे.
जिल्ह्यातील १३ गोदामामध्ये २ हजार १७२ क्विंटल साखर जमा झाली आहे. प्रत्येक महिन्याला ३७६.३३ क्विंटल साखरेची गरज जिल्ह्याला आहे. सध्या साखर वाटप प्रती एक किलोप्रमाणे सुरू आहे. राज्यशासनाकडून अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखरेचे वाटप पूर्वी केले जात होते; मात्र दीड वर्षापासून साखरवाटप बंद होते. तांदूळ आणि गहू असे धान्य प्रतिकार्ड २५ किलो मोफत दिले जात होते. आता पुन्हा प्रत्येक महिन्याला या शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाकडून घेण्यात आला असल्याने या लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
शासनाने अंत्योदय प्रतिमहिना प्रतिकिलो २० रुपये दराने साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे २.१७२ क्विंटल साखर २०२५-२६ साठी वितरित करावयाची असून, मासिक गरज ३७६.३३ क्विंटल इतकी आहे. सध्या वितरण सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

----
चौकट

जिल्ह्यातील अंत्योदयचे लाभार्थी

तालुका लाभार्थी
* मंडणगड १,५४९
* दापोली ३,३१९
* खेड ३,९९९
* गुहागर ३,२९९
* चिपळूण ६,२८९
* संगमेश्वर ७,३३१
* रत्नागिरी ४,७०४
* लांजा ३,७१६
* राजापूर ४,३२९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT