कोकण

‘जन आरोग्य’, ‘आयुष्मान’चा लाभ घ्या

CD

11285
‘जन आरोग्य’, ‘आयुष्मान’चा लाभ घ्या

जिल्हाधिकारी ः सिंधुदुर्गनगरीत जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः सामान्य कुटुंबांसाठी आजारपणामुळे येणारा आर्थिक भार दूर करण्यासाठी केंद्र व राज्याच्या एकत्रित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
एकत्रित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत स्थापन जिल्हा सनियंत्रण समिती व तक्रार निवारण समितीची बैठक मंगळवारी (ता. १६) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा समन्वयक डॉ. गोरुले आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आयुष्मान कार्ड निर्मिती व वाटपाचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४,९२,६१२ नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार झाली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिले. तसेच योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र नागरिक वंचित राहू नये, यासाठी सर्व नागरिकांनी ३१ डिसेंबरपूर्वी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले आहे.
जिल्ह्यातील योजनेअंतर्गत अंगीकृत शासकीय व खासगी रुग्णालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना दर्जेदार, पारदर्शक व मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
एकत्रित योजनेंतर्गत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष रुपये ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात येत असून, सध्या १३५६ आजारांवर मोफत उपचार अंगीकृत रुग्णालयांत उपलब्ध आहेत. ही संख्या आगामी कालावधीत २३९९ आजारांपर्यंत वाढविण्यात येणार असून, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचाही योजनेत समावेश केला आहे.
.................
गौरविलेली रुग्णालये अशी...
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बांबुळी-गोवा), ग्रामीण रुग्णालय (देवगड), अंकुर हॉस्पिटल (मालवण), डॉ. गद्रे आय केअर सेंटर (वेंगुर्ले), लाईफटाईम हॉस्पिटल (पडवे).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT