कोकण

साळशीत ‘बीएसएनएल’ला ‘नो नेटवर्क’

CD

11320

साळशीत ‘बीएसएनएल’ला ‘नो नेटवर्क’

ग्राहकांचा खोळंबा; दूरसंचार विभागाने दखल घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ : साळशी (ता.देवगड) गावातील ग्रामस्थांना मोबाईल समस्या भेडसावत आहे. बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मोबाईल नेटवर्क समस्यांमुळे गैरसोय होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सेवा सुधारण्याची स्थानिकांची आग्रही मागणी आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, साळशी गावची दूरसंचार संभाषण संपर्क व्यवस्था बिघडली असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. गेले तीन दिवस टुजी सेवा बंद पडली आहे. तसेच फोरजी सेवा देखील व्यवस्थित चालत नाही. आवाज न येणे, संभाषण चालू असताना मध्येच कॉल बंद पडणे असे प्रकार होत आहेत. तसेच संपर्कासाठी कॉल लावताना दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर विलंबाने संपर्क होतो. अशा अनेक समस्यांनी भ्रमणध्वनी ग्राहक कंटाळले आहेत. या ठिकाणी बीएसएनएल व्यतिरिक्त अन्य कोणतीही पर्यायी सेवा उपलब्ध नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. आपत्कालीन वेळेला तसेच वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी रात्रीच्यावेळी सुमारे ६ कि.मी. अंतरावर असलेल्या शिरगाव येथे जावे लागते. त्याचप्रमाणे ऑनलाईन कामे, कार्यालयीन कामे, धान्य दुकान वितरण व्यवस्था, विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास तसेच शेतकरी शेती पाणी मोटर पंप, इतर व्यवसाय देवाण-घेवाण व्यवहार बंद पडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यासंदर्भात वेळोवेळी दूरसंचार विभाग देवगड व सावंतवाडी कार्यालय येथे संपर्क साधला व अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार केले आहेत. साळशी ग्रामपंचायतीच्या वतीने या समस्येकडे यापूर्वी दूरसंचार विभागाचे पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे; मात्र अपेक्षित सेवा सुधारण्यात येत नसल्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
......................
ग्रामपंचायतीकडून यंत्रणेशी पत्रव्यवहार
साळशी येथील बीएसएनएल सेवेबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे. सेवा सुरळीत नसल्याने अनेक कामे खोळंबतात. मोबाईल रेंज समस्येबाबत यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता, तरीही अधूनमधून समस्या उद्भवत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत; २५० टेबलांवर मतमोजणी, हातकणंगलेत सर्वाधिक २२ फेऱ्या

Pune ZP Results: वारसा विरुद्ध वर्चस्व! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाचा खेळ फसणार, कुणाचं नशीब चमकणार? चुरशीच्या लढाया कोणत्या?

Tax Credit Refund : इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडबाबत दिलासा

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

SCROLL FOR NEXT