कोकण

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे कोंदण

CD

11290

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे कोंदण

खारेपाटण केंद्रशाळा; तालुकास्तरीय क्राडी स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या बाल कला, क्रीडा, ज्ञानी मी होणार समूहगीत व समूहनृत्य प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा खारेपाटण क्र.१ च्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात दर्जेदार यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

येथील वामनराव महाडिक विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या महोत्सवात खारेपाटण केंद्रशाळेच्या ६ विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळात प्रथम क्रमांक प्राप्त केला. लहान गट मुलगे कबड्डी संघाने सांघिक यश प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेते ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः गोळा फेक मोठा गट (मुलगे/मुली)-हेमंत गारगुंडे, वैष्णवी कोळसुलकर (प्रथम क्रमांक), लांब उडी मोठा गट (मुलगे/मुली)-सार्थक पोरे, अथर्व लाड, स्वरा तोडकर (द्वितीय), उंच उडी लहान गट-वैष्णवी निमणकर (प्रथम), हर्ष कानडे (द्वितीय). २०० मीटर धावणे मोठा गट मुलगे-अथर्व लाड (प्रथम). सांघिक खेळ ः लहान गट मुलगे कबड्डी संघाने प्रथम, खो-खो मोठा गट मुलगे द्वितीय, कबड्डी मोठा गट मुली द्वितीय क्रमांक, समूहनृत्य मोठा गट स्पर्धेत ‘बिहु’ या आसामी लोकनृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला.
खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य व शाळा समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, संध्या पोरे, मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT