कोकण

देवरुख - देवरुखमध्ये निराधार महिलेला मोफत टी-स्टॉल

CD

rat17p5.jpg-
11252
देवरुख ः चक्रभेदीतर्फे देवरूख येथील महिलेला मोफत टी-स्टॉल प्रदान करताना मान्यवर.

देवरूखमधील निराधार महिलेला
चक्रभेदीतर्फे मोफत टी-स्टॉल प्रदान
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १७ः चक्रभेदी सोशल फाउंडेशन आणि रक्षितम अ‍ॅग्रोनिक्स कंपनीच्या सहकार्याने देवरूख येथे निराधार महिलांना चालवण्यासाठी मोफत टी-स्टॉल प्रदान करण्यात आला. देवरूख येथे वास्तव्याला असलेल्या रजनी कोळंबेकर या निराधार महिलेला रोजगाराच्या संधीसाठी हा स्टॉल देण्यात आला आहे.
या कार्यक्रमावेळी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी प्रस्तावना केली. चक्रभेदी सोशल फाउंडेशन हे विधवा, निराधार व एकल महिलांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिव्यामुक्त समाज अभियान, मायेचे हक्काचे घर, निवाराकेंद्र, उद्योग-व्यवसाय व जीवनकौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षण तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम संस्था राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेने सात विधवा महिलांना स्टेनलेस स्टीलचे टी-स्टॉल व सुमारे एक लाख रुपयांचे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. या स्टॉलचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी तथा महाराष्ट्र बायोविकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी चक्रभेदी संस्था हे उत्तम कार्य करत असून, तिचे भविष्यात वटवृक्षात रूपांतर होईल, असे सांगितले तर पुरवठा निरीक्षण अधिकारी महेंद्र कांबळे यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक करत निराधार महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी संस्था घेत असलेले परिश्रम दखल घेण्यासारखे असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

SCROLL FOR NEXT