कोकण

सावंतवाडीत २५ डिसेंबरला ‘ज्ञानदीप’ पुरस्कारांचे वितरण

CD

सावंतवाडीत २५ डिसेंबरला
‘ज्ञानदीप’ पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या मानाच्या जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कारांचे वितरण २५ डिसेंबरला सकाळी साडेदहाला येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उद्‍घाटक गजानन नाईक, प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सी. ए. लक्ष्मण नाईक, अभिमन्यू लोंढे, संप्रवी कशाळीकर, विठ्ठल कदम आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे मानकरी स्नेहा कदम (माणगाव), शुभेच्छा सावंत (बांदा), मंदार चोरगे (वैभववाडी), सचिन वंजारी (कणकवली), राजाराम फर्जंद (दोडामार्ग), शैलेश तांबे (वेंगुर्ले), रोहन पाटील (दाणोली), राजेश कदम (देवगड), कांचन उपरकर (सावंतवाडी), अविनाश म्हापणकर (सावंतवाडी) यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सलग एकोणीस वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, सहकार, कला, संगीत, कृषी, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानदीप पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, एस. आर‌. मांगले, नीलेश पारकर, प्रदीप सावंत, विनायक गावस यांनी केले आहे. हे पुरस्कार दरवर्षी रेश्मा भाईडकर, व्ही. टी. देवण यांच्यातर्फे पुरस्कृत केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT