वेळास शाळाने पटकावले
सर्वसाधारण विजेतेपद
हिवाळी क्रीडा स्पर्धा ; केंद्रातील १२ शाळांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.१७ ः रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत मंडणगड तालुक्यातील वेसवी उर्दू केंद्राच्यावतीने आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद शाळा वाल्मिकी नगर, वेळास येथे पार पडल्या. या स्पर्धेत लहान व मोठा गटाचे सर्वसाधारण विजेतेपद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळास नं. १ ने पटकावले.
वेसवी उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख अहमद नाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. केंद्रातील एकूण १२ शाळांनी विविध क्रीडाप्रकारात सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रप्रमुख लांबे, बाणकोटचे सरपंच नुरूला परकार, माजी केंद्रप्रमुख अमरदीप यादव, विजय साळवी गुरूजी, डॉ. नौशाद अनवारे, मुजफ्फर मापकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर भोगल व उपाध्यक्षा धनश्री काणे यांच्या उपस्थितीत झाले. वैयक्तीक क्रीडाप्रकारांत लहान गटात धावण्यात शिवन्या तवसाळकर (प्रथम), लांब उडीत तनिष्का पाटील (प्रथम), सलोनी नरवणकर (द्वितीय) व थाळीफेकमध्ये गंधर्व बालगुडे (द्वितीय) यांनी यश मिळवले. मोठ्या गटात उंच उडीत हर्षिता नरवणकर (प्रथम) व समृद्धी नरवणकर (द्वितीय), मुलांच्या उंच उडीत अविष्कार सालदुरकर (प्रथम) व श्रवण पाटील (द्वितीय), १०० मीटर धावण्यात अंकुरी बालगुडे (प्रथम) व देवश्री वेळासकर (द्वितीय), गोळाफेकीत तन्मय भागडे (प्रथम) व स्वराज धाडवे (द्वितीय), लांब उडीत तन्मय भागडे (प्रथम) व अविष्कार सालदुरकर (द्वितीय), थाळीफेकीत भूमी पाटील (प्रथम) व समृद्धी नरवणकर (द्वितीय) तसेच लांब उडीत तन्वी दरीपकर (प्रथम) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सांघिक स्पर्धेत लंगडी लहान गट मुली तसेच कबड्डी, खो-खो व लंगडी या सर्व खेळांत मोठ्या गटातील मुलगे व मुली यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.