कोकण

चिमुकले रमले रंग-रेषांच्या दुनियेत

CD

O11384

चिमुकले रमले रंग-रेषांच्या दुनियेत

बांद्यातील रंगभरण स्पर्धा; अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या वतीने येथील ग्रामपंचायत सभागृहात अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान वयातच मुलांमधील सर्जनशीलता, कल्पकता तसेच शिकण्याची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. चिमुकलेही रंग रेषांच्या दुनियेत रमले.

या स्पर्धेत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ठराविक चित्रामध्ये रंग भरण्यासाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता. या कालावधीत मुले अत्यंत उत्साहाने व आनंदाने रंगकाम करताना दिसून आली. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. मुलांचा उत्साह पाहून उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धेत ९ अंगणवाड्यांमधील एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम ध्रुवी खडपकर, द्वितीय दर्श पार्सेकर, तृतीय क्रमांक अन्वी धोतरे हिने पटकावला. ओजस आईर व हर्षिता तोरसकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, तनुजा देसाई, अर्चना आंबेलकर, रत्नप्रभा सावंत-मोर्ये, क्षमता केरकर, चारुशीला परब व मानसी बांदेकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
वर्षा आगलावे म्हणाल्या की, ‘आतापर्यंत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित स्वरुपात कोणतेही कार्यक्रम झाले नव्हते. प्रथमच सर्व अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन हा उपक्रम राबविल्याने मुलांना एक नवीन, आनंददायी आणि शिकण्याचा अनुभव मिळाला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

Sunetra Pawar Beed Pune district : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकत्व, शासन निर्णय जारी

T20 World Cup ची तयारी तर सुरू, पण भारताला 'या' खेळाडूची चिंता; सगळं गणित बिघडणार

SCROLL FOR NEXT