कोकण

राजापूर ः ओणी-अणुस्कुरा मार्गांवर खड्डे

CD

rat17p18.jpg-
11296
राजापूर ः ओणी - अणुस्कुरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

‘ओणी-अणुस्कुरा’ची खड्ड्यामुळे दुरवस्था
दुरूस्तीच्या मागणीला केराची टोपली; वाहनचालकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः कोकणला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या राजापूर-अणुस्कुरा मार्गावरील ओणी-अणुस्कुरा या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, खड्डे तत्काळ बुजवून संपूर्ण मार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाचल परिसरातील ग्रामस्थांनी यापूर्वी निवेदनाद्वारे दिला; मात्र, त्याला बांधकाम विभागाने कचऱ्याची टोपली दाखवली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाकडून मुहूर्त शोधला जात आहे, अशी टीका पाचलवासीय करत आहेत.
रस्त्यातील खड्डे चुकवताना आणि खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवून आणि त्यातून प्रवास करून वाहनचालकांसह प्रवाशांचे पुरते कंबरडे मोडून गेले. गाड्यांचीही अवस्था पुरती खिळखिळी झाली आहे. ‘रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त,’ अशी रस्त्याची स्थितीमध्ये आता धुळीची भर पडली असून, प्रवाशांसह वाहनचालकांना आता दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे.
ओणी-अणुस्कुरा रस्त्याची मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे पार चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी पाचल ते अणुस्कुरा घाटापर्यंत पडलेले खड्डे काही प्रमाणात बुजवले आहेत. वाहतुकीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पूर्वपरिसरातील अत्यवस्थ रुग्णाला अधिक उपचारार्थ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईकडे नेताना त्या रुग्णाला या खड्ड्यामुळे अधिक त्रास होतो. यापूर्वी काही दुचाकीस्वार खड्ड्यामुळे पडले आहेत; मात्र, त्यानंतरही रस्त्याची दुरवस्था कायम असून, त्याबाबत वाहनचालक, प्रवाशांसह ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट
या भागात पडलेत जास्त खड्डे
ओणी दैतवाडी परिसर, सौंदळ पाटीलवाडी, सौंदळ बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण, रायपाटण, पाचल.

कोट
ओणी-अणुस्कुरा या भागामध्ये खड्डे अरूंद होत चालले असून, त्यासोबत धुळीचाही सामना करावा लागत आहे. या रस्त्याने प्रवास करणे जिकिरीचे बनले असून, खड्डा चुकवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.
- राकेश शिंदे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT