कोकण

अडखळ ग्रामपंचायतीत २२ बंधाऱ्यांची उभारणी

CD

-rat१८p२२.jpg-
२५O११६१०
अडखळ : अडखळ येथे वनराई बंधारे बांधताना गटविकास अधिकारी सुनील खरात व ग्रामस्थ, महिला.
----
अडखळ ग्रामपंचायतीत २२ बंधाऱ्यांची उभारणी
पाच गावांचे श्रमदान ; जलसंवर्धनाचा संदेश, शेतकऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या व्यापक सहकार्याने अडखळ, टाकवली, ढांगर, बुरी व गोवेले या गावांमध्ये श्रमदानातून एकूण २२ बंधारे यशस्वीपणे बांधण्यात आले. जलसंधारण व भूजल पातळी वाढीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतीला दिलासा मिळणार आहे.
या वेळी गटविकास अधिकारी सुनील खरात, विस्तार अधिकारी पवन गोसावी, सरपंच करिना रक्ते, उपसरपंच मनाली लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश रक्ते, कल्पेश शिंदे, सुनीती महाडीक, सूरज पाडावे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश शिगवण उपस्थित होते. मान्यवरांनी श्रमदानाचे महत्त्व सांगत जलसंधारणाच्या कामातून शाश्वत विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने व एकजुटीने श्रमदानात सहभाग घेतल्यामुळे कमी खर्चात प्रभावी कामे पूर्ण होऊ शकली असेही त्यांनी नमूद केले. या २२ बंधाऱ्यांच्या उभारणीमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासही हातभार लागणार आहे.
---
शेतीसाठी पाणी मिळणार
अडखळ, टाकवली, ढांगर, बुरी व गोवेले या गावांमध्ये श्रमदानातून एकूण २२ बंधारे यशस्वीपणे बांधण्यात आले. त्यामुळे येथील गावांतील शेतीच्या पाण्याची सोय होणार आहे. याबद्दल शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT