कोकण

''खरीप पीक नोंदणीसाठी २४ पर्यत अर्ज सादर करा''

CD

‘खरीप पीक नोंदणीसाठी २४ पर्यंत अर्ज सादर करा’
ऐश्वर्या काळूशे ः २५ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीमध्ये प्रत्यक्ष पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे २४ डिसेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन येथील उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीमती ऐश्वर्या काळूशे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
श्रीमती काळूशे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ''राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत १४ डिसेंबरला महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पहाणी करण्याबाबत मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव पिकांची नोंद करता आली नाही, अशांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे २४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करून पोहोच घ्यावी. त्यानुसार ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे २५ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतील.
तत्पूर्वी समितीमार्फत स्थळ पाहणीची दिनांक व वेळ निश्चित करून त्याची पूर्व कल्पना संबंधित शेतकऱ्यास, शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान ४ ते ५ शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात येईल. प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या दिवशी खरीप हंगाम २०२५ मध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची लागवड केली होती त्याची स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामा करावा व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतकऱ्यांचे जाब जबाब नोंदविण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नंबर १२ वर यापूर्वी प्रतिबिंबित झालेली नाही त्या शेतकऱ्यासंदर्भात वरील प्रक्रिया पार पाडावी.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT