शिवारआंबेरेतील
‘तो’ खांब हटवला
पावस, ता. २० ः तालुक्यातील शिवारआंबेरे हातिसकरवाडी येथील अभिमन्यू मयेकर यांच्या घराजवळ विजेचा खांब गंजल्याने धोकादायक झाला होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा खांब दुसऱ्या ठिकाणी घालण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या घराला असलेला धोका टळला आहे. शिवारआंबेरे हातिसकरवाडी येथील मयेकर यांच्या घराजवळून मुख्य वाहिनी जाते. त्यांच्या घराजवळील लोखंडी खांब वाकल्यामुळे वाहिन्याही खाली आल्या होत्या. याबाबत गेले वर्षभर महावितरण अभियंत्याशी वारंवार पत्रव्यवहार सुरू होता; मात्र ‘सकाळ’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणने त्यांच्या घराजवळील खांब दुसरीकडे हलवला आहे.