कोकण

शिरोडा खटखटे ग्रंथालयात शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन

CD

11975

शिरोडा खटखटे ग्रंथालयात
शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन
सावंतवाडी, ता. २० ः शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगातून आजगाव येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठानमार्फत ग्रंथालयात नियमित शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. आठवी आणि सातवीची एकूण १७ मुले याचा लाभ घेत असून, हे वर्ग विनामूल्य चालविले जात आहेत. त्या अनुषंगाने सातवीतील ७ मुलांना नवनीतची सुमारे पाच हजार रुपये किंमतीची मार्गदर्शक पुस्तके भेट देण्यात आली. यासाठी शिरोडा परिसरातील दानशूर व्यक्ती तथा ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष रघुवीर तथा भाई मंत्री यांनी आर्थिक सहाय्य केले. वेदांत देशमुख, प्रचिती शेटये, चिराग राणे, परेश रेडकर, गायत्री खोलकर, आर्या वळवईकर आणि ऐश्वर्या गावडे या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. याप्रसंगी मंत्री यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या मुलांना दहा हजार रुपयांची बक्षिसे जाहीर केली. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्राची पालयेकर यांनी केले होते. प्रतिष्ठानचे समन्वयक तथा शिक्षक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी आभार मानले.
......................
11974

चौके-मांडखोल शाळेला लॅपटॉप
ओरोस ः उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके-मांडखोल (ता.मालवण) या शाळेला अमेरिका देशात वास्तव्यास असलेल्या सुरेंद्र चव्हाण यांनी लॅपटॉप साहित्य उपलब्ध करून दिले. त्याबद्दल चव्हाण कुटुंबीयांचे शाळा व पालकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मेघा चव्हाण यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले. चौके ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती, पालक विद्यार्थी यांनी या शालोपयोगी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT