12816
ओटवणे ः ‘स्वच्छता मिशन’अंतर्गत येथील ग्रामपंचायत इमारत व परिसराची सफाई करण्यात आली.
12817
मालवण ः येथील पंचायत समितीत परिसर स्वच्छता मोहीम राबविताना कर्मचारी.
सिंधुदुर्गवासीयांच्या श्रमदानातून उभारले स्वच्छतेचे संस्कार
‘स्वच्छता मिशन’; तीन हजार ६२० किलो कचरा संकलित, शाळा, ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः ‘जिल्हा परिषदेच्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्र व परिसर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. अभियानात जिल्ह्यातील ३२ हजार ११८ जणांनी श्रमदान करून ३ हजार ६२० किलो कचरा संकलन केला. यात ७९५ शाळा, २४५ आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, तर ३९६ ग्रामपंचायत कार्यालये सहभागी झाली,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग हा स्वच्छ जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध आहे. स्वच्छतेसह जनजागृती होण्यासाठी २० डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शालेय स्वच्छता कार्यक्रमांत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांची सफाई, शाळा परिसर स्वच्छता आदी कार्यक्रमांचा समावेश केला होता, तर ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छता कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय व परिसराची स्वच्छता केली. अभिलेख वर्गिकरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टेबल, कपाट स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय नीटनेटके करणे, दिशादर्शक फलक लावणे, रंगरगोटी करणे आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्वच्छता कार्यक्रमांत कार्यालय व परिसर स्वच्छता, रंगरगोटी श्रमदानाच्या माध्यमातून करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांत जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रमदान केले.
--------------
जिल्ह्यातील शाळांचाही उत्स्फूर्त सहभाग
*तालुका *सहभागी शाळा *संकलित कचरा (किलो)
देवगड*९९*२७५
कणकवली*२६४*२७३
वैभववाडी*५९*१०७.५०
मालवण*१०५*४४१
कुडाळ*२२*४०
वेंगुर्ले*५३*७१
सावंतवाडी*१०१*१२५
दोडामार्ग*९२*१४२
----------------
तालुकानिहाय आरोग्य केंद्र, उपकेंद्रे सहभागी
*तालुका*सहभागी आरोग्य केंद्रे*संकलित कचरा (किलो)
देवगड*४५*१७४
कणकवली*४५*१८
वैभववाडी*१६*६६
मालवण*३९*७२
कुडाळ*३२*५५
वेंगुर्ले*२७*२१७.५०
सावंतवाडी*२२*१२३
दोडामार्ग*१९*७८
----------------
तालुकानिहाय ग्रामपंचायतींचा सहभाग
तालुका*सहभागी ग्रामपंचायत*संकलित कचरा (किलो)
देवगड*५२*२१७.५
कणकवली*६३*१०२.५
वैभववाडी*३५*६६
मालवण*६५*१८५.५
कुडाळ*५२*१४२
वेंगुर्ले*३०*३३५
सावंतवाडी*६३*४७
दोडामार्ग*३६*१३५
----
ग्राफ
स्वच्छता मोहिमेवर एक नजर...
- श्रमदानात सहभागी व्यक्ती - ३२ हजार ११८
- गोळा केलेला कचरा - ३ हजार ६२० किलो
- अभियानात सहभागी शाळा - ७९५
- सहभागी आरोग्य केंद्र, उपकेंद्रे- २४५
- सहभागी ग्रामपंचायत कार्यालये - ३९६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.