swt235.jpg
12821
आंबेगावः फाले कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द करताना संग्राम प्रभूगावकर, शिवाजी परब, रुपेश पावसकर व इतर मान्यवर.
मारहाणकर्त्यांवर गुन्हे दाखल करा
संग्राम प्रभूगावकरः फाले कुटुंबियांना शेतकरी संघटनेकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले यांच्या कुटुंबियांची सिंधुदुर्ग जिल्हा पशूधन व कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी भेट घेतली. तसेच फाले यांना उपचारासाठी मदत केली. यावेळी श्री. प्रभूगावकर यांनी मारहाणकर्त्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास शेतकरी कायदा हाती घेतील, असा इशारा दिला.
आंबेगाव येथे जात त्यांनी श्री. फाले यांना आर्थिक मदत केली. तसेच आंबोली येथे घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री. प्रभूगावकर म्हणाले, ‘‘शेतकरी फाले कुटुंब दुसऱ्यांच्या जमिनी घेऊन कसतात. अशावेळी झालेला प्रकार दुर्दैवी आहे. जनावर पाळणे त्यांना शक्य नसल्यामुळे ते नातेवाईकांकडे नेत असताना त्यांना मारहाण झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला. मारहाणकर्ते उजळ माथ्याने फिरत आहेत; मात्र फाले कुटुंबाच्या पाठीशी शेतकरी संघटना आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास कायदा हातात घेऊ.’’
आंबेगाव सरपंच शिवाजी परब म्हणाले, ‘‘आज श्री. फाले हे अंथरुणाला खिळून बसलेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही निंदनीय घटना आहे. बैल पोसण्याची त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून ते नातेवाईकांकडे घेऊन जात होते. त्यांना झालेल्या मारहाणीनंतर कुणीही त्यांची विचारपूस केली नाही. आज शेतकरी संघटना आली, त्याबद्दल आभार मानतो.’’
यावेळी त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. यावेळी रुपेश पावसकर आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आंबेगाव ग्रामस्थ व फाले कुटुंब उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.