- rat२३p७.jpg-
२५O१२७९१
रत्नागिरी ः वळके गावाची पाणीयोजना सुपूर्द करण्याचे पत्र सावित्री ग्रामसंघातील महिलांना देताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे. सोबत डावीकडून सागर पाटील, मयूरी पाटील, कांबळे, उत्तम सावंत, संजय दळवी, घुमा आदी.
----
वळकेत ‘जलजीवन’ची धुरा महिलांच्या हाती
पाणीयोजना सावित्री ग्रामसंघाकडे; लोकसहभागासह महिला सक्षमीकरणाचा पॅटर्न
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी,ता. २३ ः वळके महसूल गाव मराठवाडी (ता. रत्नागिरी) येथील जलजीवन मिशन योजनेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि प्रत्यक्ष योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सावित्री महिला ग्रामसंघाकडे सोपवून या गावाने महिला सक्षमीकरणाचा टप्पा गाठला आहे. नुकताच या संदर्भातील अधिकृत करार मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत वळके महसूल गाव मराठवाडी हे गाव नेहमीच शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेते. २०२० ला जलजीवन कार्यक्रमांतर्गत घोषणा झाल्यानंतर या गावाने त्यात सहभाग घेतला. गावातील काही दानशूर नागरिकांनी योजनेच्या विविध उपयोगासाठी म्हणजेच विहीर व पंपघरासाठी जमीन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केली. यासाठी २२ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर आहे. या योजनेवर गावातील ७९ कुटुंबे अवलंबून आहेत. या गावांमध्ये सर्वांच्याकडे नळजोडणी असून, गावातील ८० टक्के कुटुंबाकडे जलमापक आहेत. ते काम प्रगतिपथावर आहेत. २५ ऑगस्ट २०२५ रोजी गाव हर घर जल घोषित झाल्यानंतर गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने ग्रामसंध्याकडे योजना देखभाल व दुरुस्तीसाठी सावित्री महिला ग्रामसंघाला देण्याचा निर्णय घेतला. स्वतः महिला योजनेची सर्व देखभाल दुरुस्ती करत असतात तसेच पाणीपट्टी वसुली करत असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी प्रत्यक्षात योजनेच्या संचालन देखभाल दुरुस्तीची पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायतीने एकमुखाने ही योजना ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीसाठी देण्याबाबतचा निर्णय घेतला. तसा करार नुकताच करण्यात आला आहे. या योजना हस्तांतरणाच्यावेळी प्रकल्प संचालक सागर पाटील, कार्यकारी अभियंता मयूरी पाटील, महिला बालकल्याणचे कार्यक्रमाधिकारी श्री. कांबळे, तसेच पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सरपंच उत्तम सावंत, ग्रामपंचायत अधिकारी संजय दळवी, सावित्री महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा घुमा, सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
चौकट
ग्रामसंघाला स्वतंत्र कार्यालय
सावित्री ग्रामसंघामध्ये एकूण १४ स्वयंसहाय्यता बचतगट असून, १७३ महिला सहभागी आहेत. या ग्रामसंघाला त्यांच्या दैनंदिन कामासाठी व पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टी वसुली करण्याच्या कामी मदत व्हावी यासाठी स्वतंत्र कार्यालय ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.