rat23p14.jpg
12837
हुस्नबानू खलिफे
rat23p15.jpg-
12838
जमीर खलिफे
---------------
अॅड. खलिफेंना महिला नगराध्यक्षांचा दुसऱ्यांदा बहुमान
राजापूरच्या इतिहासात प्रथमच : आमदार म्हणूनही कार्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ः राजापूर पालिकेच्या नगराध्यपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या अॅड. हुस्नबानू खलिफे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. विधान परिषदेच्या आमदार आणि राजापूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये दोनवेळा लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष असा बहुमान पटकावणार्या अॅड. हुस्नबानू खलिफे राजापूरच्या पहिल्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमारेखेवर वसलेल्या राजापूर नगरीचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी तब्बल १४९ वर्षापूर्वी राजापूर पालिकेची स्थापना झाली. या स्थापनेनंतर आजपर्यंत तब्बल २७ जणांनी नगराध्यक्षपद भूषवले. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या अॅड. खलिफे यांनी बाजी मारली. खलिफे यांनी राजापूरच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान यापूर्वी पटकावला आहे. त्यांनी २००१ ते ०६ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषवले आहे. नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर पुढे त्या आमदार (विधान परिषद सदस्य) झाल्या. आमदार होणार्या त्या राजापूरच्या एकमेव नगराध्यक्ष आहेत. आता झालेल्या निवडणुकीत त्या पुन्हा नगराध्यक्ष निवडून आल्या आहेत. दोनवेळा महिला नगराध्यक्ष आणि आमदार होणाऱ्या त्या राजापूरच्या पहिल्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
चौकट
माता-पुत्र झाले आहेत लोकनियुक्त नगराध्यक्ष
राजापूरच्या दोनवेळा लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष आणि आमदार होण्याचा मान अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी पटकावला आहे. त्यांचे सुपुत्र अॅड. जमीर खलिफे हेही लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्यांमध्ये अॅड. हुस्नबानू खलिफे आणि अॅड. जमीर खलिफे असे एकमेव माता-पुत्र ठरले आहेत. आता झालेल्या निवडणुकीतही अॅड. जमीर खलिफे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे खलिफे माता-पुत्र पालिकेच्या सभागृहामध्ये एकाचवेळी असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.