कोकण

सव्वादोन हजार शेतकरी विमा परताव्याच्या प्रतीक्षेत

CD

KOP25O12888
एआय छायाचित्र

सव्वादोन हजार शेतकऱ्यांना विमा परताव्याची प्रतिक्षा
५७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊनही भरपाई शून्य; शेतकरी वर्गात तीव्र संताप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः प्रधानमंत्री पिकविमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जाते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत विमा काढलेल्या सुमारे सव्वादोन हजार शेतकऱ्यांना एक रुपयाचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. विमा परतावा देण्याबाबतच्या निकषांमधील बदल आणि पिककापणी प्रयोगांवर अवलंबून असलेली प्रक्रिया यामुळे यंदा नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामातील विमा योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नाही; परंतु शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या भातशेतीलाही विमा परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. मागील तीन वर्षात खरीप हंगामात विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. यंदा म्हणजेच २०२५-२६ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात २ हजार २५७ शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. त्यांचे ५७९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. यामध्ये भाताचे २ हजार १७६ शेतकऱ्यांचे ५५४ हेक्टर क्षेत्र तर नागलीतील ८१ शेतकऱ्यांचे २५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. त्यापोटी शेतकऱ्यांनी प्रीमियम रक्कमही भरलेली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विशेषतः ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कमी आणि मध्यम कालावधीत तयार होणारी भातपिकं पावसामुळे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांचे ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या पोटी ४ कोटी रुपयांची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. शासनाची मदत पोचली तरीही विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभांश देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे विमा काढला, हप्ता भरला आणि पिकांचे नुकसानही झाले तरीही पिककापणी प्रयोग न झाल्याने किंवा सरासरी उत्पादनात नुकसान कमी दाखवले गेल्याने भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, पिकविमा योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शासनाने विमाभरपाईसाठी पिककापणी प्रयोग हाच मुख्य आणि एकमेव निकष ठरवला आहे. जिल्ह्यात भाताचे क्षेत्र ५१ हजार हेक्टरइतके आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने ९००हून अधिक ठिकाणी पिककापणी प्रयोग केले आहेत. ज्या ठिकाणी पिककापणी प्रयोग झाले तिथे नुकसान नोंदले गेले तरच तेथील विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे पिककापणी प्रयोगातील मिळालेल्या उत्पादनावर विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा परतावा अवलंबून राहणार आहे.

कोट
जिल्ह्यातील पिककापणी प्रयोगातील आकडेवारी ऑनलाईन भरण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनी निकषानुसार पुढील निर्णय घेईल. यंदा शासनाने एकाच निकषावर आधारित विमा परतावा देण्याचे निश्चित केले आहे. यंदाची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना परतावा निश्चितच मिळेल.
- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

Interstate Car Racket : कार भाड्याने घ्यायचे, अन् बनावट कागदपत्रे बनवून विकायचे; आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश; दोघे जेरबंद!

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

SCROLL FOR NEXT