कोकण

किंजवडे महोत्सव अंतर्गत विकासकामांचे लोकार्पण

CD

12896

किंजवडे महोत्सवअंतर्गत
विकासकामांचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत किंजवडे श्री स्थानेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला ‘किंजवडे महोत्सव’ उत्साहात झाला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयप्रकाश परब यांनी महोत्सवाला भेट देत मार्गदर्शन केले.
सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून कार्यक्रम झाला. श्री. खेबुडकर, श्री. परब यांच्यासह प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या विकासात्मक तसेच पंचायत राज अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पण, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन सत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला. सहायक गटविकास अधिकारी विनायक पाटील, आनंद मालाडकर, महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी समीर होडावडेकर, विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधीक्षक मेधा राणे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेर्से यांचा सन्मान करण्यात आला. उपसरपंच विनय पाडावे, दिलीप कदम तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. श्री. तेर्से यांनी आभार मानले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

Video : 'या' अत्यंत पवित्र ठिकाणी विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ ! चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

Gold Rate Today : आज सकाळीच सोनं आणखी स्वस्त! जागतिक घडामोडींचा परिणाम; ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT