कोकण

रत्नागिरी पालिकेच्या सभागृहात १७ नवीन चेहेरे

CD

रत्नागिरी पालिकेत १७ नवीन चेहेरे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ः पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ३२ पैकी २९ उमेदवार महायुतीचे तर तीन उमेदवार आघाडीचे निवडून आले. त्यामध्ये १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली असून, १० माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला तसेच १७ नवीन चेहरे सभागृहात येणार आहेत. त्यामध्ये उद्धवसेनेचे ३, भाजप २ तर शिंदे शिवसेनेचे १२ उमेदवार नवीन आहेत.
उद्धव शिवसेनेचे फक्त तीनच उमेदवार निवडून आले असून, ते सर्वच नवीन चेहरे आहेत. त्यात फौजिया तनवीर मुजावर, केतन उमेश शेट्ये, अमित विलणकर यांचा समावेश आहे. केतन शेट्ये यांना राजकीय पार्श्वभूमी असून, त्यांचे वडील उमेश शेट्ये हे माजी नगराध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळालेले सहाही उमेदवार निवडून आले आहेत. त्यात चार माजी नगरसेवक तर २ नवीन चेहरे आहेत. नवीन चेहऱ्यामध्ये नितीन जाधव व वर्षा ढेकणे यांचा समावेश आहे. शिवसेनेचे १२ नवीन उमेदवार निवडून आले असून, त्यामध्ये सौरभ मलुष्टे, पूजा पवार, राजीव कीर, मेधा कुळकर्णी, गणेश भारती, नाहिदा सोलकर, विजय खेडेकर, सायली पाटील, जागृती पिलणकर, आफ्रीन होडेकर, निवेदिता कळंबटे, रूखसार खान यांचा समावेश आहे. महायुतीच्या १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये शिंदे सेनेचे ११ तर भाजपच्या चारजणांचा समावेश आहे. यामध्ये वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, निमेश नायर, प्रीती सुर्वे, राजन शेट्ये, श्रद्धा हळदणकर, दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, मानसी करमरकर, राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, राकेश नागवेकर, सुहेल साखरकर, संतोष कीर, सुहेल मुकादम यांचा समावेश आहे.

नवख्यांकडून पराभव
नगरपालिकेत निवडणुकीत १० माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामध्ये सलील डाफळे, उज्ज्वला शेट्ये, रशिदा गोदड, अस्मिता चंवडे, सुशांत चवंडे, भास्कर आंबेकर, नाझनीन हकीम, सईद पावसकर, राजश्री शिवलकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नवख्या उमेदवारांकडून अनुभवी मंडळींना पराभव स्वीकारावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंकडून सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

प्राजक्ता माळीचा चेहरा सेम वडिलांसारखा, नाक, डोळे सुद्धा जसेच्या तसे, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

SCROLL FOR NEXT