कोकण

रत्नागिरी-जिल्हा रूग्णालयाच्या आरोग्य सेवेत होतेय क्रांती

CD

12960

जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत होतेय क्रांती
अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे शक्य

चौकट
दृष्टिक्षेपात...
* बाह्यरुग्ण तपासणी ५०० वरून ९०० वर
* गुडघे, खुबा बदलण्याच्या मोफत शस्त्रक्रिया
* माता, बालमृत्यूच्या प्रमाणात घट
* दीड वर्षात २ हजार ७२५ नैसर्गिक प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आणि काही वर्षांतच जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत क्रांती होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी ज्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरला धाव घ्यावी लागत होती त्या आता रत्नागिरीतच मोफत आणि यशस्वीरित्या होत आहेत. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केलेल्या दाव्यानुसार, जिल्हा रुग्णालयावरचा रुग्णांचा विश्वास वाढला असून, बाह्यरुग्ण तपासणी संख्या ५०० वरून दररोज ९०० च्या वर गेली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे इथे आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे हे सर्व शक्य झाले आहे.
रत्नागिरीत शरीराच्या अतिशय महत्त्वाच्या आणि नाजूक अवयव असलेल्या मेंदूच्या शस्त्रक्रिया ही अशक्यप्राय गोष्ट होती; परंतु आता ते शक्य झाले आहे. जिल्हा रुग्णालयात आता न्युरोसर्जन डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अपघात आणि मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया इथेच होत आहेत. रुग्णांना मुंबई-पुण्याला पाठवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शल्य चिकित्सा विभागात गेल्या दीड वर्षात १६४५ जनरल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. यात थायरॉइड, फुगीर शिरा आणि स्वादुपिंड खराब असलेल्या रुग्णांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
ऑर्थोपेडिकतज्ज्ञ उपलब्ध असल्याने गुडघे आणि खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियादेखील वाढल्या आहेत. हाडांच्या शस्त्रक्रियांमध्ये खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येतात त्या आता शासकीय रुग्णालयात डॉ. देवकर आणि त्यांच्या टीमने मोफत केल्या जात आहेत. विशेषतः ऑक्टोबर २०२५ मध्ये दुर्बिणीद्वारे गुडघ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामध्ये आजपर्यंत ५ हिप रिप्लेसमेंट (खुबा बसवणे), १० नी रिप्लेसमेंट (गुडघा बदलणे), ५ ऑर्थोस्कोपी आणि ३ स्पाईन सर्जरीसह एकूण ६१८ मेजर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
माता आणि बालसंगोपनच्यादृष्टीने मोठा विश्वास निर्माण झाला आहे. ७५० ग्रॅमच्या बाळाला जीवदान देत नवजात शिशू विभागात डॉक्टरांनी जणू चमत्कार केला म्हणावे लागले. मार्च २०२५ मध्ये अवघे ७५० ग्रॅम वजन असलेल्या आणि जगण्याची आशा कमी असलेल्या बाळावर डॉ. शयान पावसकर व डॉ. वडगावकर यांनी ६० दिवस अथक प्रयत्न केले. आज हे बाळ १६९० ग्रॅम वजनाचे असून, ठणठणीत बरे झाले आहे. गायनॅकोलॉजिस्ट डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड वर्षात २ हजार ७२५ नैसर्गिक प्रसूती आणि १ हजार ९७५ सीझर प्रसूती झाल्या आहेत.

चौकट
ईएनटी आणि नेत्रविभागाची भरारी
ईएनटी डॉ. बागे यांच्यामुळे आता दुर्बिणीद्वारे विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया होत आहेत. यात नाकात/घशात अडकलेल्या वस्तू काढणे, कानाचा पडदा सांधणे आणि अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. नेत्रविभागात जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात तब्बल १०८० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ मिळाले असून, हजारो गोरगरीब रुग्णांना याचा थेट फायदा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

SCROLL FOR NEXT