कोकण

आयडियल इंग्‍लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्‍साहात

CD

kan241.jpg
13058
वरवडे : येथील आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्यांना भगवान लोके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आयडियल इंग्‍लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्‍साहात
विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव; सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २४ : वरवडे येथील आयडियल इंग्‍लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्‍साहात साजरे झाले. या कार्यक्रमात राज्‍य, जिल्‍हा पातळीवरील विविध स्पर्धांत पारितोषिक प्राप्त केलेल्‍या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव हरिभाऊ भिसे. प्रा. नीलेश महिंद्रकर, डी. पी. तानावडे, अनंत बडे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई आदी उपस्थित होते. यावेळी असलदे सोसायटीचे चेअरमन भगवान लोके हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. यावेळी स्कॉलरशिप, ऑलंपियाड, तायक्वाँदो, मल्लखांब, बुद्धिबळ अशा स्पर्धांमधील तालुका जिल्हा आणि राज्यपातळीवरील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच रंगोत्सव या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्‍कार करण्यात आला. यावेळी प्रा. हरिभाऊ भिसे, बुलंद पटेल, भगवान लोके, मोहन सावंत आदींनी मनोगत मांडले. शिक्षक हेमंत पाटकर आणि शिक्षिका शीतल बांदल यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: विकृतीचा कळस! ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; शाळेच्या शिपायचं किळसवाणं कृत्य, मुंबईत खळबळ

Nashik Citylink Bus : नाशिकमध्ये सिटीलिंकच्या तिकीट दरात गोंधळ; एका दिवसात ७ रुपयांची वाढ झालीच कशी?

Latest Marathi News Live Update : भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज

'आप सठिया गये है क्या?' प्रार्थना बेहेरने बिग बींना विचारलेला अजब प्रश्न, मिळाली थेट नोकरी

T20 World Cup: 'फिल्डिंग कर, पागल आहेस का...'रोहित आला सूर्याला भेटला अन् मग नेमकं काय झालं? पाहा Video

SCROLL FOR NEXT