कोकण

क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन

CD

rat२२p१.jpg-
२५O१२५३३
रत्नागिरी : नाटेकर, गांधी, कीर महाविद्यालयात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन यांचे स्वागत करताना दत्तात्रय मांजरेकर. यावेळी विनायक हातखंबकर, जानकी घाटविलकर, धनेश रायकर, प्रवीण आंबेकर, रूपेश पंगेरकर आदी.
---
निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती
मकरंद पटवर्धन ःकीर महाविद्यालयात क्रीडा महोत्सव सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमार्फत गेले पाच वर्ष रत्नागिरीमध्ये सायकल चळवळ सुरू आहे. निरोगी निरामय आयुष्य म्हणजे खरी संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी सायकल चालवा, व्यायाम करा, निरोगी राहा. विविध कला, क्रीडेमध्ये सातत्याने सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो, असे प्रतिपादन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्यकारिणी सदस्य मकरंद पटवर्धन यांनी केले. पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला (कै.) सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी वाणिज्य व श्रीमान रमेश कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन केल्यावर ते बोलत होते. शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर, सदस्य प्रवीण आंबेकर, विश्वस्त विनायक हातखंबकर मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर आदी उपस्थित होते. महोत्सवात क्रिकेट, डॉजबॉल, कबड्डी, धावणे, गोळा फेक, दोरीउड्या, रस्सीखेच आदी स्पर्धां होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध भारताचा 'इम्पॅक्ट प्लेयर' कोण? BCCI ने शेअर केला ड्रेसिंग रुममधील BTS Video

निवृत्त अधिकाऱ्याकडे ६२ लाखांची रोकड, अडीच किलो सोनं अन् २० किलो चांदी; बँक लॉकरमध्येही मोठं घबाड, फ्लॅट-प्लॉटची कागदपत्रं

Latest Marathi News Live Update : पीरागढी उड्डाणपुलावर एका गाडीत तीन मृतदेह आढळले

HRA Tax: भाडेकरूंसाठी खुशखबर! एचआरए नियमांत ऐतिहासिक बदल; सरकारचा मोठा निर्णय, आता पैसे वाचणार

T20 World Cup मधील पहिलाच विजय भारतीय संघासाठी ठरला विश्वविक्रमी! ऑस्ट्रेलियालाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT