कोकण

कुडाळ-मालवण तालुक्यात पाच नवीन आरोग्य उपकेंद्र

CD

कुडाळ-मालवण तालुक्यात
पाच नवीन आरोग्य उपकेंद्र
२ कोटी ८० लाख निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः कुडाळ-मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले. या निधीमुळे कुडाळ-मालवण तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तारकर्ली (ता. मालवण) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहे तर, कुडाळ तालुक्यातील वाडोस, गोठोस, जांभवडे आणि घोटगे या गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या उपकेंद्रांमुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक उपचार, तसेच आपत्कालीन आरोग्य सुविधा जवळच्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत. या नवीन आरोग्य उपकेंद्रांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. याबाबतची माहिती आमदार राणे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT