swt244.jpg
13093
कुडाळ : येथील तहसीलदार कार्यालयासमोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या नेतृत्वाखाली बीएलओ कामाविरोधात धरणे आंदोलन केले.
‘बीएलओ’विरोधात कुडाळात
प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची बीएलओ कामासाठी प्रशासनाकडून नियुक्ती केली आहे. याविरोधात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या नेतृत्वाखाली एकवटत कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बीएलओचे काम करण्यास शिक्षकांनी कडाडून विरोध दर्शवला. बीएलओचे काम करणे पूर्णपणे बंद करण्यात येत असून, प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत, या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने यावेळी प्रशासनाला दिला. या आंदोलनात ज्येष्ठ शिक्षक नेते चंद्रकांत अणावकर, राज्य सहसचिव राजन कोरगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य दादा जांभवडेकर व सचिन मदने, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक, तालुका सचिव महेश गावडे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आपा सावंत, संतोष वारंग, तालुका नेते प्रसाद वारंग, स्वामी सावंत, श्रीकांत उगवेकर, अनंत राणे, संजना राऊळ, भार्गवी कापडी, सुगंधा अणावकर, सावली सुर्वे, गोपाळ गावडे, शैलेंद्र न्हावेलकर, शिवा चव्हाण आदींसह तालुक्यातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित केले. दरम्यान,नायब तहसीलदार गवस व निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी आंदोनलस्थळी येऊन शिक्षक समितीचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.