कोकण

पडवे शाळेस ''स्मार्ट लर्निंग स्टुडिओ''

CD

swt247.jpg
13108
पडवेः येथील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या स्मार्ट लर्निग स्टुडिओचे लोकार्पण करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर.

पडवे शाळेस ‘स्मार्ट लर्निंग स्टुडिओ’
माजी विद्यार्थ्यांचे सहकार्यः मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकरांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावे घेवून शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन केले होते. याला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद लाभला आहे. याच आवाहनाचे फळ म्हणजे पडवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी विद्यार्थ्यांनी स्मार्ट लर्निंग स्टुडिओ, प्रोजेक्टर रूम, संगणक कक्ष उपलब्ध करून दिला आहे. यासाठी शाळेचे व माजी विद्यार्थ्यांचे या उपक्रमाचे आपण विशेष कौतुक करीत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पडवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ‘नवदशाब्दी माजी विद्यार्थी स्नेहसंगम’ कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पडवे येथे शाळेच्या स्थापनेला २१ डिसेंबरला ९० वर्ष पूर्ण झाल्याने ‘नवदशाब्दी माजी विद्यार्थी स्नेहसंगम’ हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास श्री. खेबुडकर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. खेबुडकर यांनी पडवे शाळेने केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. मराठी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत बोलताना त्यांनी, मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी शाळा टिकली पाहिजे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करावे, यासाठी शिक्षक, पालक व समाजाने एकत्र येऊन मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. श्री. वालावलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. निवेदन पंढरीनाथ तेंडोलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन तुकाराम कसालकर यांनी केले.

चौकट
बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशीलः खेबुडकर
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. विशेषतः बचत गटांमधील महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली दैनंदिन कामे कमी वेळेत व अधिक प्रभावीपणे करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले पाहिजे, हे आपले स्वप्न आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे सांगत त्यांनी बचत गटातील महिलांसाठी लवकरच आपल्या जिल्ह्यात दोन अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज मॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री. खेबुडकर यांनी दिली.

चौकट
लोक मदतीतून १५ लाखांच्या सुविधा
श्री. खेबुडकर यांनी ‘शिकवण्याची पद्धत बदला, एआय सोबत भविष्य घडवा,’ असे आवाहन जिल्ह्यातील शाळा, शिक्षक व माजी विद्यार्थी यांना केले होते. या टॅग लाईनने प्रेरित होऊन लोकसहभागातून लाखो रुपयांची विकास कामे शाळेमध्ये करण्यात आली आहेत, असे यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. तब्बल १५ लाख रुपये किमतीच्या या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे आजच्या संगणकीय युगात पडवे शाळेचे विद्यार्थी मागे राहणार नसून अत्याधुनिक सुविधा युक्त शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

निवृत्त बॅंक अधिकारी ६० लाखाला फसला! दागिने विकले, नातेवाइकांकडूनही पैसे घेतले, सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडले; आभाशी २ कोटी दिसले,‌ त्याचा टॅक्सही भरला, पण...

Nitin Gadkari: ''हत्येपूर्वी काही तास हमास प्रमुखांना भेटलो'', नितीन गडकरींनी सांगितला घटनाक्रम

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

IPL २०२६ आधी आरसीबीच्या स्टार खेळाडूला मोठा धक्का! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, तुरूंगात रवानगी होणार?

SCROLL FOR NEXT