कोकण

चिपळूणमध्ये १२ जानेवारीपासून किर्तनमाला

CD

-ratchl२४१.jpg
२५O१३११३
चारुदत्त आफळे
-----
पेशवाईच्या सुवर्णकाळावर कीर्तनमाला
चिपळुणात १२ जानेवारीपासून आयोजन ; रसिकांना पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः येथील श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित कीर्तनमाला १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या दहाव्या कीर्तनमालेत पेशवाईचा सुवर्णकाळ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९.३० या कालावधीत ही कीर्तनमाला होईल.
कीर्तनमालेचे उद्‍घाटन १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या कीर्तनमालेचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती चारुदत्त आफळे यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते. दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा हा जागर रसिकांसाठी पर्वणी असतो. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप असणारी वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रवेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे स्मरणीय ठरत आली आहे. शहरातील बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक वासुदेव दळवीकाका महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या या कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून विषय उलगडत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT