rat२४p१०.jpg-
२५O१३०८६
रत्नागिरी : कोतवडे हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात क्रीडा ज्योत प्रज्वलित करताना संजय मयेकर. सोबत प्रेमदास पवार, नरेश कांबळे, सुधीर कांबळे, स्वप्नील मयेकर आदी.
----
विद्यार्थ्यांनो मैत्रिपूर्ण भावनेने खेळ खेळा
संजय मयेकर ः कोतवडे हायस्कूलचा क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करावे, तरच उद्याचा भविष्यकाळ चांगला आहे. खेळाडूंनी समोरच्या खेळाडूला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये अशा प्रकारच्या भावनेने मैत्रीपूर्ण खेळ खेळावा, असे प्रतिपादन कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे (मुंबई) उपाध्यक्ष संजय मयेकर यांनी अध्यक्षस्थानावरून केले. मंडळ संचालित कोतवडे येथील विजयसिंहराजे पटवर्धन इंग्लिश स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली. खेळाडू वृत्तीची शपथ घेऊन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून चैतन्य निर्माण केले. शिवकालीन आखाड्यामध्ये लहान मुलं मुंबईवरून येऊन लोप पावलेली कला पुनर्जीवित करण्याचे काम केले. या वेळी छोट्या मुलांनी दांडपट्टा बनाटी आग गोळे ढाल, तलवार, लाठीकाठी यांचे प्रात्यक्षिक करून वातावरण क्रीडामय करून टाकले. यामुळे क्रीडांगणावरचे वातावरण जोशपूर्ण झाले. या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष नरेश कांबळे, सुधीर कांबळे, संस्था कार्यकारणी सदस्य प्रकाश ठोंबरे, सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, क्रीडा विभाग प्रमुख गुरुदास खुळे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील मयेकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव, विजय बेहेरे उपस्थित होते.
चौकट १
शाळा पोलिस मैत्रीसंबंध
पोलिस निरीक्षक यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एका खेळाची आवड जपावी, जेणेकरून आजच्या युगामध्ये जी व्यसनाधीनता वाढलेली आहे ती कमी करता येईल. जिथे मन सुदृढ असेल तिथेच आपल्याला प्रगती करता येते. मैत्रीपूर्ण संबंध जपता येतात, असे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने पोलीस प्रशासन आणि ग्रामीण भागातील शाळा व ग्रामीण भागातील ग्रामस्थ यांच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्यामध्ये पोलीस अधिकारी यशस्वी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.