कोकण

आगरवायगणीत क्रीडा महोत्सव

CD

आगरवायंगणीत
क्रीडा महोत्सव
गावतळे ः दापोली तालुक्यातील आगरवायंगणी विद्यालयातील क्रीडांगणावर दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. क्रीडा महोत्सवाला आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश पवार, संस्था सचिव संतोष आंबेकर, मुख्याध्यापक सत्यवान दळवी, क्रीडाशिक्षिका जयश्री रिंगणे, शिक्षक अनिश काळे आदी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवात व्हॉलिबॉल, कबड्डी, लंगडी, खो-खो, क्रिकेट या सांघिक खेळांचा समावेश होता. मैदानी स्पर्धेत १०० मी. व २०० मी. धावणे, गोळाफेक, थाळीफेक अशा खेळांचा समावेश होता.

देवरुखात जिल्हास्तरीय
विज्ञान प्रदर्शन सुरू
साडवली ः शिक्षण विभाग रत्नागिरी व देवरूख न्यू इंग्लिश स्कूल, सृजन विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन सृजन सायन्स सेंटर येथे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांचे अध्यक्षतेखाली आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाणे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, नरेंद्र गावंड, गटशिक्षणाधिकारी विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, तानाजी नाईक, केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे आदी उपस्थित होते. यानिमित्त विज्ञान दिंडी न्यू इंग्लिश स्कूल येथून सुरू होऊन संपूर्ण बाजारपेठेला प्रदक्षिणा करत सृजन सायन्स सेंटरला पोहचली.

खेर्डी शाळेत
शैक्षणिक पालक परिषद
गावतळे ः दापोलीतील खेर्डी शाळेत त्रैमासिक पालक परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खेर्डीच्या सरपंच रिया पवार, उपाध्यक्ष सानिका मांडवकर, शिक्षणतज्ज्ञ मिलिंद यादव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कदम, रीना बैकर आदी उपस्थित होते. केंद्रस्तरीय व प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये खेर्डी शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषद निकाल! राष्ट्रवादीने घेतली आघाडी, ताजी आकडेवारी काय?

Parbhani ZP Election: घराणेशाहीला बसवलं घरात! वरपुडकरांच्या मुलगा, मुलगी, सुनेसह पुतण्याचाही पराभव; माजी मंत्र्याला मोठा धक्का

Jawali Taluka ZP and Panchayat Samiti Election Results : जावळीचे 'किंग' मानकुमरेच! चुरशीच्या लढतीत सेनेच्या उमेदवारावर मात; मंत्री शिवेंद्रसिंहराजे 'तो' शब्द पाळणार?

पुण्यात महापौर-उपमहापौर बिनविरोध; भाजपच्या विनंतीला मान देत काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली माघार

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

SCROLL FOR NEXT