swt248.jpg
13135
सावंतवाडी ः शहरात नाताळ सणानिमित्त विविध साहित्य दाखल झाले आहे.
swt249.jpg
13136
सावंतवाडी ः नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांची घरे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळू निघाली आहेत.
swt2410.jpg
13134
सावंतवाडी ः नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी तसेच चर्चसमोर अशा प्रकारे गोठ्यातील येशू ख्रिस्त जन्माचा देखावा साकरण्यात येतो.
आनंद, प्रार्थना अन् प्रकाशाचा नाताळ
जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांचा उत्साह शिगेला; धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः नाताळ सणानिमित्त जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांमध्ये मोठ्या उत्साहासह भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. नाताळ तसेच येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडत आहेत.
नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून तो साजरा केला जातो. या सणानिमित्त ख्रिस्ती धर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठी लगबग दिसून येत आहे. ख्रिसमस ट्री, तारे, रोषणाईची सजावट, आकर्षक दिवे, सांता क्लॉजच्या प्रतिकृती, भेटवस्तू, मिठाई तसेच सजावटीच्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या कालावधीत ख्रिस्ती बांधवांकडून घरोघरी कॅरल सिंगिंगचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यात येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद धार्मिक गीतांच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच या उपक्रमात सहभागी होतात. यामुळे परिसरात आनंदी आणि उत्सवी वातावरण निर्माण असते.
जिल्ह्यात नाताळपूर्व काळात शहरात ख्रिस्ती बांधवांकडून प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीतून शांतता, प्रेम, बंधुता आणि सद्भावनेचा संदेश देण्यात आला. धार्मिक गीते तसेच विविध संदेश देणारे देखावे लक्षवेधी ठरले. यावेळी सांताक्लॉजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या (ता.२५) साजऱ्या होणाऱ्या नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच २४ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात येते. मध्यरात्री १२ वाजता विशेष ‘मिडनाईट मास’द्वारे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा साजरा केला जातो. या प्रार्थनेत मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी होऊन येशूच्या आगमनाचे स्वागत करतात. प्रार्थनेदरम्यान शांतता, सौहार्द, एकोपा आणि मानवतेच्या कल्याणासाठी विशेष आशीर्वाद मागण्यात येतात. तसेच घरोघरी पारंपरिक फराळ व विविध स्वादिष्ट पदार्थांची तयारी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांची घरेही विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. एकूणच आप्तेष्ट, शेजारी आणि मित्रमंडळींसोबत आनंद, प्रेम आणि आपुलकीच्या वातावरणात हा सण साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण जिल्ह्यात या सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
चौकट
गोठ्यांच्या लक्षवेधी प्रतिकृती
येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला, या घटनेच्या स्मरणार्थ घरोघरी तसेच मोठ्या चर्च तसेच छोट्या चर्चसमोर (चॅपेल ) येशू ख्रिस्त जन्माचा देखावा म्हणजेच आकर्षक गोठे उभारण्यात आले आहेत. या गोठ्यांमध्ये बाल येशू, माता मरिया, सेंट जोसेफ, मेंढपाळ व देवदूतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या असून सजावटीची कामे पूर्ण झाली आहेत. हे गोठे उभारणीसाठी पारंपारिक वस्तूंचा वापर करण्यात येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.