RATCHL२५१.JPG -
13427
चिपळूण ः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेताना प्रशांत यादव व नवनिर्वाचित नगरसेवक.
-------------
चिपळूणच्या विकासासाठी सहकार्य
रवींद्र चव्हाणः चिपळूण नगरसेवकांनी घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ः येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी भाजप नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेत चिपळूणच्या स्मार्ट सिटीसंदर्भात चर्चा केली. चव्हाण यांनी चिपळूण शहर विकासासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास नगरसेवकांना दिला.
चिपळूण पालिकेत भाजप - शिवसेना युतीतर्फे निवडणूक लढवली गेली. भाजपने ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. यापैकी सात नगरसेवकांनी विजय मिळवला. पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर निवडणूक संयोजक म्हणून सोपवण्यात आली होती. याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवकांनी नेते यादव यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेत चर्चा केली. चव्हाण यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करत विकासकामांवर भर देण्याची सूचना केली.
याशिवाय संघटनावाढीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजप उत्तर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भोबस्कर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, वैशाली निमकर, रूपाली दांडेकर आदी उपस्थित होते.