rat२५p२३.jpg-
१३४६१
रत्नागिरीः क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि प्रिती सुर्वे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
--------------
नगरसेवक मलुष्टे, सुर्वे यांचा सत्कार
रत्नागिरी, ता. २६ ः नगरपालिका निवडणुकीत क्रेडाई रत्नागिरीचे सक्रिय सदस्य सौरभ मलुष्टे आणि क्रेडाई बोर्ड मेंबर रवींद्र सुर्वे यांच्या पत्नी प्रिती सुर्वे यांची नगरसेवकपदी निवड झाली. याबद्दल क्रेडाई रत्नागिरीच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम क्रेडाईच्या रत्नागिरीच्या कार्यालयात झाला.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांना रोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले. ‘पर्यावरणपूरक विकास’ हा संदेश केवळ कागदावर न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी बोलताना क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, सौरभ मलुष्टे आणि प्रिती सुर्वे यांच्या रूपाने अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व पालिकेत गेल्यामुळे शहराच्या नियोजित विकासाला गती मिळेल. बांधकाम क्षेत्रातील बारकावे आणि नागरी समस्यांची जाण असलेले हे नेतृत्व शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी उपयुक्त ठरेल.